ICHMH51NEWS.IN
9921600800

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षपूर्तीनिमित्त निमित्त  आयोजित कार्यक्रमासाठी इचलकरंजी शहरातील नागरिक रवाना

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षपूर्तीनिमित्त निमित्त  आयोजित कार्यक्रमासाठी इचलकरंजी शहरातील नागरिक रवाना

इचलकरंजी
     महाराष्ट्र शासनाच्या वतीने  ‘हिंद दि चादर ‘ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या  ३५० व्या शहीदी वर्षपूर्तीनिमित्त ‘हिंद-दी-चादर’ ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम भव्य स्वरूपात आयोजित केला जात आहे.
या अनुषंगाने नवी मुंबई (खारघर)  येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि. २८ फेब्रुवारी आणि रविवार दि. १ मार्च रोजी हा कार्यक्रम होणार असून यामध्ये भक्तीगीते, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रबोधनात्मक उपक्रमांद्वारे त्यांचे बलिदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविले जाणार आहेत.
   शासन निर्देशानुसार गेल्या पंधरा दिवसांपासून इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने या कार्यक्रमा अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आलेले आहेत.
‌   खारघर, नवी मुंबई येथे होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे यासाठी इचलकरंजी शहरातील शिख,
सिंधी तसेच सिकलगार समाजातील प्रतिनिधी समवेत आयुक्त पल्लवी पाटील यांनी बैठक घेऊन कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असलेल्या सर्व समाज बांधवांना इचलकरंजी महानगरपालिकेकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली होती.
    या अनुषंगाने आज शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी इचलकरंजी शहरातील आणि शहर परिसरातील जवळपास २५० शिख, सिंधी आणि सिकलगार समाज बांधव ४ लक्झरी बस मधून रवाना झाले.
 यापैकी इचलकरंजी शहरामधुन
शहिदी समागम कार्यक्रमासाठी जाणाऱ्या बसचे आणि श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या प्रतिमेचे पुजन आयुक्त पल्लवी पाटील व उपमहापौर अनिल डाळ्या यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व बांधवांना शुभेच्छा देणेत आल्या.
    यावेळी शिख समाजाचे  दिलप्रीत सिंग,सौ व श्री सुरींदर मंगलानी, माजी सहा. आयुक्त विजय राजापुरे, प्रशासन अधिकारी इरफान पटेल, सहा आयुक्त नितिन बनगे,संजय कांबळे यांचेसह शिख, सिंधी,सिकलगार व अन्य भाविक आदी उपस्थित होते.

खारघर येथे भाविकाना रवाना करताना आयुक्त पल्लवी पाटील,उपमहापौर अनिल डाळ्या व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा