रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबसचे आदर्श एकत्र कुटुंब व आदर्श गृहिणी पुरस्कार प्रदान.
इचलकरंजी
रोटरी सेन्ट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब इचलकरंजी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श एकत्र कुटुंब व आदर्श गृहिणी यांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले, प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेचे नवनियुक्त महापौर श्री उदयराव धातुंडे व नवनिर्वाचित नगरसेविका सौ.रुपाताई बुगड यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले, अध्यक्ष स्थानी संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाशराव सातपुते हे होते, स्वागत प्रोजेक्ट कमिटी चेअरमन श्री शिवबसु खोत यांनी केले तर प्रास्ताविक अध्यक्ष श्री सुनिल कोष्टी यांनी करत असताना क्लबच्या वतीने विविध समाज उपयोगी, शैक्षणिक, वैद्यकीय व सामाजिक उपक्रमाचा आढावा घेतला.
प्रमुख पाहुण्यांची ओळख सेक्रेटरी श्री किरण कटके व श्रीमती प्राजक्ता होगाडे यांनी करून दिली, मान्यवरांचे स्वागत व सत्कार संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते व सुनिल कोष्टी यांनी केले.
यानंतर आदर्श एकत्र कुटुंब पुरस्कार साठी निवड झालेल्या श्री व सौ.ध्रुवकुमार पांडुरंग बोनगे आणि परिवार , श्री व सौ.बंडोपंत ईश्वरा लाड आणि परिवार व श्री व सौ.मोहनराव दत्तात्रय सातपुते आणि परिवार यांना या.महापौर उदयराव धातुंडे व नगरसेविका सौ.रुपाताई बुगड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले, या वर्षीचा आदर्श गृहिणी पुरस्कार सौ.पद्मावती श्रीकांत निमणकर यांना प्रदान करण्यात आला,शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
यानंतर संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाशराव सातपुते यांनी मनोगत व्यक्त केले, त्यानंतर प्रमुख पाहुणे महापौर श्री उदयराव धातुंडे यांनी रोटरी प्रोबसच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले करत असताना त्यांनी आपल्या जीवनातील अनेक प्रसंगही यावेळी सांगितले व महानगरपालिकेमार्फत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. रोटरी ही सेवा देणारी संस्था असून अशा संस्थेमध्ये आपण कार्यरत आहात ही आदर्श गोष्ट आहे अशी सांगितले.नगरसेविका सौ रुपाताई बुगड यांनी मनोगत व्यक्त केले, याप्रसंगी पुरस्कार प्राप्त बंडोपंत लाड,व मोहनराव सातपुते यांनी मनोगत व्यक्त केले तर ध्रुव कुमार बोनगे यांच्या वतीने श्री संतोष कांदेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रोटरी प्रोबसच्या महिला भगिनींनी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
आभार सौ.निर्मला मोरे यांनी मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अनिता कार्तिक कागले यांनी केले.
या कार्यक्रमाला जयश्री चौगुले, संगीता लडगे, जुगलकिशोर तिवारी रामचंद्र निमणकर मनिषा कोष्टी प्रमोद लाटणे, दिलीप भंडारे, अविनाश खोत, हेमंत कवठे, शारदा कवठे,बाबासाहेब पाटील, वैभव डोंगरे, अनिल ज्वारे आनंदा मेटे रामदास कोळी बापुसाहेब घुले मल्लिकार्जुन तेग्गी माधवी कुलकर्णी, दिपाली कोळी, दिलीप शेट्टी, जयप्रकाश शाळगावकर,ऍड.मृणाल माने, मंगल डोंगरे, विना श्रेष्ठी ,आनंदी हजारे, राजश्री वाटेगावे ,प्रमोदीनी देशमाने व पुरस्कार प्राप्त परीवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रोटरी पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







