ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीचा अजिंक्य रेडेकर महाराष्ट्र श्री चा मानकरी स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच जिल्ह्यात अजिंक्यपद

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीचा अजिंक्य रेडेकर महाराष्ट्र श्री चा मानकरी
स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच जिल्ह्यात अजिंक्यपद


इचलकरंजी –
महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोशिएशनच्या वतीने सांगली येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचाखेळाडू श्री शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अजिंक्य रेडेकर याने महाराष्ट्र श्री चा किताब पटकविला. स्पर्धेच्या इतिहासात कोल्हापूर जिल्ह्याला पहिल्यांदा अजिंक्य रेडेकर याच्यामुळे महाराष्ट्र श्री चा मान मिळाला आहे. आमदार विश्‍वजित कदम आणि अजिंक्यचे प्रशिक्षक मनिष अडविलकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सांगली येथील तरुण भारत व्यायाम मंडळाच्या क्रीडांगणावर तब्बल 30 वर्षानंतर ही स्पर्धा पार पडली. या महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव राज्यस्तरीय स्पर्धेत थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेसाठी राज्यभरातून 500 पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले होते. एकूण दहा गटात झालेल्या या स्पर्धेतून अजिंक्य रेडेकर हा 80 ते 85 किलो गटातून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. मानाच्या किताबासाठी इचलकरंजीचा अजिंक्य रेडेकर आणि ठाण्याचा राहुल क्षेत्रे यांच्यात जोरदार चुरस रंगली होती. त्यामध्ये क्रीडारसिक प्रेक्षकातून मिळालेल्या जोरदार प्रतिसादामुळे व पिळदार शरीरयष्टीच्या बळावर अजिंक्य रेडेकर याने बाजी मारली. महाराष्ट्र श्री विजेता म्हणून अजिंक्य रेडेकर याच्या नांवाची घोषणा होताच शौकिनांनी टाळ्यांच्या गजरात जल्लोष केला. गत काही वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात अजिंक्य रेडेकर याने आपला दबदबा निर्माण केला असून वस्त्रनगरीच्या नांवलौकिकात मोलाची भर घातली आहे. नुकताच त्याने नवी मुंबई महापौर श्री चा किताब मिळविला असून यापूर्वी मिस्टर युनिर्व्हचाही बहुमान मिळाला आहे.
या यशाबद्दल अजिंक्य रेडेकर याचे सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांनी अभिनंदन केले.
महाराष्ट्र श्री पुरस्कार स्वीकारताना अजिंक्य रेडेकर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा