ICHMH51NEWS.IN
9921600800

ई-बस स्थानकाच्या कामाचा परिवहन सभापती अरुणा बचाटे यांच्याकडून आढावा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ई-बस स्थानकाच्या कामाचा परिवहन सभापती अरुणा बचाटे यांच्याकडून आढावा

इचलकरंजी :
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या पी.एम. ई-बस सेवा (PM E-Bus Service) योजनेअंतर्गत इचलकरंजी शहरात ई-बस सेवा सुरू करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित परिवहन सभापती सौ. अरुणा बचाटे यांनी प्रस्तावित ई-बस स्थानकास भेट देऊन सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला.
केंद्र शासनाच्या निधीतून इचलकरंजी शहरासाठी सुमारे २० ई-बस मंजूर झाल्या आहेत. शहरातील नागरिकांना आधुनिक, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या ई-बस सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले बसस्थानक, चार्जिंग स्टेशन व इतर सुविधा उभारण्यासाठी महानगरपालिकेकडून सुमारे ५ कोटी १० लाख रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
या प्रकल्पासाठी सोलगे मळा परिसरात जागा निश्चित करण्यात आली असून त्या ठिकाणी बसस्थानकासोबतच अत्याधुनिक ई-बस चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहे. जागेचे नियोजन पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकामालाही सुरुवात झाली आहे. परिवहन सभापती अरुणा बचाटे यांनी कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रगती, नियोजन, चार्जिंग सुविधांची उभारणी तसेच बस संचालनाची भविष्यातील व्यवस्था याबाबत सविस्तर माहिती घेतली.
यावेळी त्यांनी सांगितले की, ई-बस सेवा सुरू झाल्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होणार असून प्रदूषण कमी होण्यासही मोठी मदत होईल. नागरिकांना कमी खर्चात सुरक्षित व आधुनिक प्रवास सुविधा उपलब्ध होणार असल्याने शहराच्या विकासातही या प्रकल्पाचा महत्त्वाचा वाटा राहणार आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी महापौर उदय धांतुडे, उपायुक्त नंदू परळकर, नगर अभियंता महेंद्र क्षीरसागर, प्रमोद बचाटे, उमाकांत दाभोळे, सहाय्यक अभियंता भोरे, मक्तेदार जोतीराम बरगे, उन्हाळे आदी उपस्थित होते. यावेळी संबंधित कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या.
इ बस स्थानकाच्या कामकाजाची पाहणी करताना अरुणा बचाटे,महापौर उदय धातूंडे,उपायुक्त नंदू परळकर,मक्तेदार जोतिराम बरगे
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा