जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
इचलकरंजी :
शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख, इचलकरंजी महानगरपालिकेचे नगरसेवक, गटनेते रविंद्र माने यांच्या यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक, क्रीडा आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी यंदा त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्धार केला आहे.
वाढदिवसानिमित्त मराठा समाजाच्या वतीने भव्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भव्य लाकूड ओढण्याची शर्यत वडगाव बाजार समितीच्या मैदानावर रविवार दि.१५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या शर्यतीच्या आयोजनामुळे शर्यत शौकिनांमध्ये मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.
समाजासाठी रात्रंदिवस कार्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम जिल्हा आरोग्य विभाग व शिवसेना शहराच्यावतीने राबविण्यात येणार असून त्याचे नियोजन जिल्हा आरोग्य विभागाचे सदस्य अमित रणवरे यांनी केले आहे. याशिवाय अवधूत आखाडा व्यायाम मंडळाच्यावतीने मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात येणार आहे. इचलकरंजी शहर शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली चव्हाण यांच्या पुढाकारातून मारुती मंदिरात लाडू वाटप करण्यात येणार आहे. तसेच अब्दुल लाट येथील बालोद्यानात मुलांसाठी भोजनाची व्यवस्था कमिटी सदस्य मीनाताई मोरे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने शहरातील विविध ठिकाणी पाणपोईची व्यवस्था मित्रोदय मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे. तसेच महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणीतील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार कोल्हापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्यावतीने जिल्हाप्रमुख वैशाली डोंगरे व शहर प्रमुख जोत्स्ना भिसे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला आहे.
या सर्व उपक्रमांमधून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती वाढदिवस गौरव समितीच्या वतीने देण्यात आली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







