ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीईमध्ये ड्रोन व कृत्रिम बुध्दिमता बूटकॅम्प यशस्वी ः विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीईमध्ये ड्रोन व कृत्रिम बुध्दिमता बूटकॅम्प यशस्वी ः विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव

इचलकरंजी
 येथील डीकेटीईच्या कॉम्प्युटर ए.आय.एम.एल. विभाग आणि सी-डॅक, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अन्मैन्ड् एअरक्राफट सिस्टीम व अर्टिफिशिएल इंटेलिजन्स या विषयावर आयोजित करण्यात आलेला पाच दिवसीय बूटकॅम्प नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. या बूटकॅम्पमुळे विद्यार्थ्यांना अधुनिक तंत्रज्ञानाची ओळख झाली असून भविष्यातील करिअरसाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्यासाठी मोठी मदत झाली आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या कल्पना रुजत असून संशोधन व नाविण्यपूर्ण काम करण्याची प्रेरणा मिळत आहे.
या बूटकॅम्पमध्ये डीकेटीईच्या द्वितीय व तृतीय वर्षातील विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहाने सहभाग घेतला या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी माहितीच नव्हे, तर प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळाला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढला आणि नव्या तंत्रज्ञानाची आवड निर्माण झाली. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना ड्रोन तंत्रज्ञानाची सोपी माहिती, कृत्रिम बुध्दिमता व मशिन लर्निंग यांची ओळख, ओपन सीव्ही चा वापर, फलाईट सिम्युलिएशन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विषेश म्हणजे विद्यार्थ्यांनी ड्रोन तयार करणे आणि त्याचे उड्डाण कसे करायचे याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक अनुभवले त्यामुळे शिकलेले ज्ञान कसे वापरायचे हे विद्यार्थ्यांना समजले.
या बूट कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कल्पना शोधल्या, उदयोजकीय कौशल्यांचा सन्मान केला आणि सी-डॅक मधील तज्ञ मार्गदर्शक कौशल शर्मा, अमन श्रीवास्तव, वेदांत मुखेकर, आदित्य खोपरे आणि मिहीर हरणे यांचे मार्गदर्शन मिळाले व त्यांच्याशी विविध विषयांवर उहापोह करण्यात आला याचा फायदा विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधन करण्यास होणार असून यामुळे भविष्यातील इन्व्होवेटीव्ह प्रोजेक्टसाठी या नविन धोरणांचा वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
या बूटकॅम्पसाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाशआण्णा आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्‍वस्त, संचालिका प्रा.डॉ. एल.एस.आडमुठे, विभागप्रमुख डॉ एस.के. शिरगांवे यांचे मार्गदर्शन लाभले तर समन्वयक म्हणून सौ.डी.एम.कुलकर्णी, सौ. व्ही.बी.सुतार व सौ. आर.एम. कांबळे यांनी काम पाहिले.
डीकेटीईमध्ये बूटकॅम्पमध्ये ड्रोनचे प्रात्यक्षिक करताना विद्यार्थी.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा