ICHMH51NEWS.IN
9921600800

स्वरांजली लाईव्ह अकॅडमी तर्फे गायन कार्यक्रम संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

स्वरांजली लाईव्ह अकॅडमी तर्फे गायन कार्यक्रम संपन्न

इचलकरंजी:
येथील रोटरी क्लब सेंट्रल, स्वरांजली लाईव्ह अकॅडमी आणि स्वरांजली महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी हौशी गायिकांसाठी लाईव्ह गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहर परिसरासह सांगली व बेळगाव येथील गायिकांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. एस. के. व्ही. एन. ग्रुपनेही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संगीत संयोजन स्वरसाज म्युझिकचे दिपक काळे यांनी केले.
      अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष घनश्याम सावलानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रोजेक्ट चेअरमन वसंत संपकाळे, सचिव अमर कांबळे, ज्येष्ठ सिने गायक पद्माकर कुरकुटे, बेळगाव जिल्हा गौरव पुरस्कार प्राप्त चंद्रज्योती देसाई व प्लेबॅक सिंगर हर्षदा परिट यांची उपस्थिती होती.
    यावेळी सुमन तारळेकर, मुकुंद तारळेकर, उदय होगाडे, विजय कसलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वरांजली महिला मंचच्या अध्यक्षा स्मिता जगताप व सुषमा मिणेकर यांनी स्वागत व प्रस्तावना केली. सूत्रसंचालन स्नेहल बागेवाडी यांनी केले. कार्यक्रमास संगीतप्रेमी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

गायन कार्यक्रमात सहभागी कलाकार

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा