कन्या महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाच्या शैक्षणिक भेटी
इचलकरंजी
श्रीमती. आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजीमधील मानसशास्त्र विभागामार्फत इचलकरंजी येथील “झेप गतिमंद मुलांची शाळा (अध्ययन अक्षम मुलांचे उपचारात्मक शिक्षण केंद्र) येथे शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली. या भेटीत प्राध्यापकांसह बी.ए. भाग 1, 2 व 3 च्या विद्यार्थिनींनी गतिमंद व अध्ययन-अक्षम मुलांचे बौद्धिक, सामाजिक व भावनिक विकास, त्यांचे वर्तन वैशिष्ट्ये तसेच उपचारात्मक व विशेष शिक्षण पद्धतींचे प्रत्यक्ष निरीक्षण करून वैकासिक मानसशास्त्र विषयातील संकल्पनांचा अनुभवाधिष्ठित अभ्यास केला.
तसेच दिनांक 14/03/2026 रोजी मानसशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमानुसार आमच्या महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागामार्फत बी.ए. भाग 1, 2 व 3 च्या विद्यार्थिनींसाठी “आधार शहरी बेघर निवारा केंद्र, इचलकरंजी” येथे अभ्यास भेट आयोजित करण्यात आली. या निवारा केंद्राची देखभाल व व्यवस्थापन “डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन, इचलकरंजी, कोल्हापूर” ही संस्था करते. या शैक्षणिक भेटीदरम्यान प्राध्यापक व विद्यार्थिनींनी मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून बेघर व्यक्तींची मानसिक, सामाजिक व भावनिक स्थिती, त्यांच्या पुनर्वसनासाठी केले जाणारे प्रयत्न तसेच संस्थेचे कार्य यांचा अभ्यास करून सामाजिक मानसशास्त्रातील संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. प्रमिला सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. उदयसिंग कांबळे व विद्यार्थिनी यांनी यशस्वीरित्या शैक्षणिक भेटी दिल्या.

झेप गतिमंद मुलांच्या शाळेत भेटीदरम्यान विद्यार्थीनी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800