ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीचा अजिंक्य रेडेकर ‘पुणे महापौर श्री’ चा विजेता

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीचा अजिंक्य रेडेकर ‘पुणे महापौर श्री’ चा विजेता

इचलकरंजी –
पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुणे महापौर श्री 2026 या शरीर सौष्ठव स्पर्धेत कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा खेळाडू अजिंक्य रेडेकर याने अजिंक्यपद मिळविले.
खडकवासला मतदारसंघातील धनश्री कोल्हे यांच्या मार्गदर्शनखाली बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन पुणे यांचे वतीने महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनशी संलग्न संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा सिंहगड रोडवरील श्री गणेश गार्डन बँक्वेट हॉल येथे घेण्यात आली. या स्पर्धेसाठी अजिंक्य रेडेकर याचे गुरु मनीष अडविलकर, चेतन पाठारे, विक्रम रोठे, किरण सावंत, शरद मारणे, अजय गोळे, राजेश वडाम, संदीप यादव, दिपक माने यांची परिक्षक म्हणून काम पाहिले.
या स्पर्धेत राज्यभरातील तीनशे पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेचा शुभारंभ पुण्याच्या महापौर सौ. मंजुषा  नागपुरे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पुणे जिल्ह्यातील निवड चाचणीमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 135 खेळाडूंमधून 70 खेळाडूंची निवड करण्यात आली होती.
अंतिम फेरीत अजिंक्य रेडेकर, नंदलाल झा व पंचक्षरी लोणार या तिघांमध्ये अटीतटीची चुरस झाली अखेर इचलकरंजीचा अजिंक्य रेडेकर राज्यस्तरीय पुणे महापौर श्री 2026 चा विजेता ठरला. याप्रसंगी महापौर मंजुषा नागपुरे, दीपक नागपुरे, धनश्री कोल्हे, अनिकेत हरपुडे, दत्तात्रय कोल्हे, विजय मते, रमेश गायकवाड, विजय कोल्हे, महेश हगवणे, यशवंत कोल्हे, राजेंद्र चव्हाण, शरद मारणे, अजय गोळे आदी मान्यवर उपस्थित होते. एकापाठोपाठ एक स्पर्धा गाजवत आणि अजिंक्यपद मिळवत अजिंक्य याने वस्त्रनगरीच्या नांवलौकिकात भर घातल्याने सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
पुणे महापौर श्री ‘किताब जिंकल्यानंतर अजिंक्य रेडेकर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा