ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीई राजवाडयामध्ये गुढीपाडव्यानिमित्त ‘जीवनसंगीत‘ कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीई राजवाडयामध्ये गुढीपाडव्यानिमित्त ‘जीवनसंगीत‘ कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न

इचलकरंजी
 प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही डीकेटीईच्या राजवाडयामध्ये गुढीपाडव्यानिमित्त पहाटेचा ‘स्वरप्रभात-जीवनसंगीत‘ हा खास मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. सुरेल स्वरांच्या साक्षीने नववर्षाची मंगलमय सुरवात झाली. गुढीपाडव्या निमित्त राजवाडयावर करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने राजवाडा उजाळून निघाला या नेत्रदिपक रोषणाईने उपस्थितांना अक्षरशः डोळयांचे पारणे फिटल्याचा आनंद दिला.
हा कार्यक्रम डीकेटीई, आपटे वाचन मंदीर व पं.बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर केलेला होता. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलानाने पहाटे ४.३० वा झाली त्यानंतर जितेंद्र कुलकर्णी यांच्या शास्त्रीय गायनाने वातावरण भक्तीमय झाले. यानंतर त्रिगुण पुजारी, स्मिता कुलकर्णी, शिरीष कुलकर्णी, सृष्टी सबनीस, श्रध्दा सबनीस, शिवाजी लोहार, गौरी पाटील, दीपक फडके, शिरीष कुलकर्णी आणि सहकारी आदी कलाकारांनी एकापेक्षा एक सरस मराठी गीते सादर करत उपस्थितांची मन जिंकली. या सर्वांना संगीतकार लक्ष्मण पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या वर्षी जीवनसंगीत गाणी या संकल्पनेवर आधारित मराठी चित्रपटांमधील बहारदार गीतांचा आस्वाद रसिकांना देण्यात आला. गाण्यांच्या गोडव्यामुळे गुढीपाडव्याचा आनंद अधिकच द्विगुणित झाला. विशेष आकर्षण म्हणून यंदा बारा बलुतेदार ही पारंपारिक थीम साकारण्यात आली. यात केशकर्तनकार म्हणून संजय काशिद, परीट म्हणून दत्तात्रय बन्ने, सुतार म्हणून रमेश यादव, माळी म्हणून प्रेमनाथ पवार, चर्मकार म्हणून आनंदा यादव आणि गोंधळी म्हणून विजय गोंधळी यांनी आपल्या व्यवसायाचे जिवंत सादरीकरण केले. उत्कृष्ठ पारंपारिक वेशभूषेसाठी विविध पारितोषीके प्रदान करण्यात आली यामध्ये जीजाऊंच्या रुपांत मिहीरा पाटील, छ.शिवाजी महराज च्या रुपात श्रेयांक श्रेणीक पाटील तसेच पुजारी वेशभुषेत मनिष पुजारी यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रमास माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, डीकेटीईच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे, उत्तम आवाडे, बाळकृष्ण बुवा चे उमेश कुलकर्णी,आपटे वाचन मंदीर चे सुषमा दातार, यांच्यासह माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, सर्जेराव पाटील, रेवती आवाडे, डीकेटीईच्या संचालिका डॉ एल.एस.आडमुठे, कुबेर मगदुम यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी, नागरिक, संगीत श्रोते मोठया संख्येने उपस्थित होते. प्रा. सचिन कानिटकर यांच्या प्रभावी सुत्रसंचालनाने कार्यक्रमाला रंगत आली.
डीकेटीईमध्ये स्वरप्रभात कार्यक्रमात पारंपारिक वेशभुषेमध्ये चिमकुल्यांचा सत्कार करीत असताना माजी मंत्री प्रकाश आवाडे व इतर मान्यवर.
 डीकेटीईमध्ये स्वरप्रभात कार्यक्रमात कला सादर करीत असताना कलाकार
 डीकेटीईमध्ये स्वरप्रभात कार्यक्रमात बारा बलुतेदार ही पारंपारिक वेशभुषेचा सत्कार करीत असताना मान्यवर व कलाकार
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा