ICHMH51NEWS.IN
9921600800

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांचा इचलकरंजीतील वस्त्रोद्योग अभ्यास दौरा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांचा इचलकरंजीतील वस्त्रोद्योग अभ्यास दौरा

इचलकरंजी:
 प्रशिक्षणार्थी नऊ आयएएस (भारतीय प्रशासकीय सेवा) अधिकाऱ्यांनी इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाचा अभ्यास करण्यासाठी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कापूस ते गारमेंट या संपूर्ण उत्पादन प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती घेतली.
यावेळी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी अधिकाऱ्यांना कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्सटाईल पार्कला भेट देऊन वस्त्रोद्योगाची सखोल माहिती करून घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अधिकाऱ्यांनी अत्याधुनिक सुमारे १५०० मशिनरी असलेल्या टेक्सटाईल पार्कमधील विव्हिंग आणि सायझिंग युनिट्सना भेट दिली. तसेच महेश को-ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिललाही भेट देत उत्पादन प्रक्रियेचा अभ्यास केला.
दौऱ्यादरम्यान इचलकरंजीचे अप्पर तहसीलदार महेश खिलारे, दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, संचालक सतीश कोष्टी, पांडूरंग सोलगे तसेच के.ए.टी.पी.चे व्यवस्थापकीय संचालक निशिकांत सावर्डेकर यांनी अधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी इचलकरंजी व परिसरातील वस्त्रोद्योगाची सद्यस्थिती, त्यातील प्रगती आणि शहराच्या विकासातील योगदान याबाबत सविस्तर माहिती दिली.
पुढील सेवाकाळात वस्त्रोद्योगाशी संबंधित योजना समोर आल्यास या क्षेत्राच्या वाढीसाठी आणि प्रोत्साहनासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा चंद्रकांत पाटील व निशिकांत सावर्डेकर यांनी व्यक्त केली.
दौऱ्याच्या शेवटी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन आणि सविस्तर मार्गदर्शनाबद्दल आयोजकांचे आभार मानले.

अभ्यास दौऱ्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी व पॉवरलूम असोसिएशनचे सदस्य.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा