न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत मिळकतीत प्रवेश, दोन जणांवर गुन्हा दाखल
कबनुर :
टायगर होम फायनान्स प्रा. लि. या कंपनीच्या ताब्यात असलेल्या मिळकतीत बेकायदेशीर प्रवेश करून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ऋषिकेश बळवंतराव देशमुख (वय 32, रा. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी गोविंद भद्रय्या सुलेगाम (वय 42) व भाग्यलक्ष्मी गोविंद सुलेगाम (वय 35, दोघे रा. इचलकरंजी) यांनी संगनमत करून न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला.
दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजण्यापूर्वी हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथील गट क्र. 173 मधील प्लॉट क्रमांक 1 वरील मिळकतीत आरोपींनी बेकायदेशीर प्रवेश केला. यावेळी मिळकतीवरील कुलूप व सील तोडून नुकसान करत ती मालमत्ता स्वतःच्या ताब्यात घेतल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार इंदुलकर करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







