इचलकरंजीत गुटखा विक्री प्रकरणी गुन्हा दाखल; ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त,कोल्हापुरातून कारवाई
इचलकरंजी :
राज्यात बंदी असलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोल्हापुरातून आलेल्या पथकाने गोपनीय माहितीद्वारे कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली रोडवरील बिग बाजार शेजारी असलेल्या ‘आयुब बेकर्स’ येथे आरोपी आयुब महमंद मोमीन (वय ३८, रा. इचलकरंजी) हा दुकानाच्या पाठीमागील खोलीत गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा करून विक्री करत होता. महाराष्ट्रात या पदार्थांवर बंदी असतानाही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याने हा साठा ठेवला होता.
पोलीसांनी छापा टाकला असता आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. या कारवाईत ४८,१४३ रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ व ३,२०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ५१,३४३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी फिरोज सलीम बेग यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध विविध कलमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पुनम माने पो नि महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.दरम्यान आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







