ICHMH51NEWS.IN
9921600800

श्री आदिनाथ बँकेस २ कोटी ५९ लाख रूपयेचा नफा- चेअरमन बाळासाहेब चौगुले

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्री आदिनाथ बँकेस २ कोटी ५९ लाख रूपयेचा नफा- चेअरमन बाळासाहेब चौगुले

इचलकरंजी-ता. ३
येधील श्री आदिनाथ को-ऑप. बँकेस नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेकडे रु *१८४ कोटी ७५ लाखाच्या* ठेवी व *रु १११ कोटी ७८ लाख* कर्जे आहेत. सन २०२५-२६ या वर्षाअखेर बँकेकडील नेट एनपीए चे प्रमाण *०%* इतके आहे. बँकेला या आर्थिक वर्षामध्ये *२ कोटी ५१ लाख* इतका ढोबळ नफा झाला असून आवश्यक तरतुदी करून निव्वळ नफा *१ कोटी १० लाख* इतका झाला आहे.
    चेअरमन श्री. बाळासाहेब चौगुले यांनी मनोगतामध्ये सांगितले की आपल्या बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ यशस्वीरित्या पूर्ण करत बँकींग क्षेत्रात आपली भक्कम व विश्वासार्ह ओळख अधिक दृढ केली आहे. सदर आर्थिक वर्षात बँकेने सर्वच प्रमुख घटकांमध्ये उल्लेखणीय वाढ नोंदवून स्थिर व सक्षम आर्थिक कामगिरी केली आहे. बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत डिजीटल बँकींग अंतर्गत मोबाईल बँकींग अॅप, UPI / QR Code सेवा, ATM सेवा यामध्ये लक्षणीय विस्तार केलेला आहे ग्राहकांच्या गरजेनुसार विविध आकर्षक कर्ज योजना व शासकीय अनुदानित योजना राबवून लघु व मध्यम उद्योग, व्यापारी वर्ग, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक बळ देण्यात बँकेने महत्वपुर्ण भुमिका बजावली आहे. बँकेने ग्राहकांचा विश्वास जपताना पारदर्शक, जलद सेवा आणि सुरक्षित व्यवहार यावर विशेष भर दिला आहे. तसेच बँकेच्या अत्याधुनिक वेबसाईट इ. सह इतर अनुदानित सुविधांचा त्यामध्ये आण्णासाहेब पाटील महामंडळ अर्थसहाय्य व पंतप्रधान सुर्यघर आणि मुख्यंमंत्री सौर कृषी वाहिनी योजनांचा लाभ ग्राहक घेत असून एकूणच बँकेच्या सेवांबद्दल ग्राहक समाधान व्यक्त करत आहेत. रिझर्व्ह बँकेचे सहकारी बँकींग संचालकांचा १० वर्षे कार्यकालाबाबत नियम, तांत्रिक सोयी सुविधा खर्च, जागतिक युध्दजन्य परिस्थिती, सरकारी व खाजगी बँकींग बरोबर स्पर्धा हे सहकारी बँकींग पुढे येणा-या काळात मोठे आव्हान राहणार आहे
     सहकारातील आमचे मार्गदर्शक मा. कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) व मा. मंत्री प्रकाशराव आवाडे (आण्णा) यांचे नेहमीच बहुमोल मार्गदर्शन लाभत असून मा. स्वप्नीलजी आवाडे व युवानेते आमदार डॉ. राहुलजी आवाडे यांचेही सहकार्य लाभलेले आहे या सर्वांचे मी विशेष आभार मानतो
     माझ्या सर्व सहकारी संचालकांनी कोणताही निर्णय हा बँकेच्या हिताच्या दृष्टीने व बैंक सक्षम होण्याच्या दृष्टीने घेतलेला आहे. भविष्यात डिझीटल सेवाचा विस्तार, एनपीए नियंत्रण आणि ग्राहकाभिमुख नवीन योजना यामाध्यमातून प्रगतीचा वेग कायम ठेवणेसाठी प्रयत्नशील असणार आहोत त्याचप्रमाणे बँकेचे सर्व भागधारक, ग्राहक, ठेवीदार यांनी बँकेवरती दाखविलेल्या विश्वासामुळे बँकेने प्रगती साधलेली आहे त्यांचेही मी मनापासून आभार मानतो या वर्षी सभासदांना चांगल्या पध्दतीचा डिव्हीडड देणेचा आमचा मनोदय असल्याचे सांगितले
     यावेळी बँकेचे व्हा. चेअरमन श्री. चंद्रकांत पा मगदूम, तसेच ज्येष्ठ संचालक श्री कुंतिलालजी पाटणी, सुभाष काडाप्पा, अभयकुमार मगदूम, मधुकर मणेरे, श्रेणिक मगदूम, सुदर्शन खोत, अनिल बम्मण्णावर, संपत कांबळे, गुरुनाथ हेरवाडे, सुकुमार पोते, सीए-सुचित हेरवाडे तसेच संचालिका सौ मंगल देवमोरे, सौ. अनिता चौगुले, त्याचप्रमाणे बीओएम सदस्य सीए-उमेश कोळी, अनिल कुडचे व सी.ई.ओ. जयकुमार उपाध्ये उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा