ICHMH51NEWS.IN
9921600800

श्री बालाजी पतसंस्थेला ३.२० कोटींचा निव्वळ नफा- मदन कारंडे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्री बालाजी पतसंस्थेला ३.२० कोटींचा निव्वळ नफा- मदन कारंडे

इचलकरंजी
इचलकरंजी येथील श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ३ कोटी २० लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष मदनरावजी कारंडे यांनी दिली.
सन १९९२ मध्ये सामान्य व कष्टकरी नागरिकांना सावकारीतून मुक्त करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली ही संस्था आज आर्थिकदृष्ट्या सक्षम बनली असून सातत्याने प्रगती करत आहे. चालू आर्थिक वर्षात जागतिक घडामोडी, तेल दरवाढ, ऊर्जा टंचाई तसेच वस्त्रोद्योगातील मंदी यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीतही संस्थेने समाधानकारक कामगिरी केली आहे.
संस्थेकडे सध्या १६३.७५ कोटी रुपयांच्या ठेवी असून १३१.२१ कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. सभासद संख्या २२,५२९ इतकी आहे. संस्थेचे भागभांडवल ७.२६ कोटी तर राखीव व इतर निधी २३.६३ कोटी रुपये आहे. सुरक्षित गुंतवणूक ६२.०४ कोटी रुपये असून एकूण व्यवसाय २९४.९६ कोटींवर पोहोचला आहे. खेळते भांडवल २०६.७० कोटी रुपये आहे.
संस्थेचा भांडवल पर्याप्तता दर (CRAR) १४.६४ टक्के, कर्ज-ठेव गुणोत्तर (CD Ratio) ७३.५८ टक्के असून एनपीए शून्य टक्के आहे. व्यवस्थापकीय खर्चाचे प्रमाण १.५१ टक्के इतके नियंत्रित ठेवण्यात आले आहे. संस्था दरवर्षी सभासदांना १० टक्के लाभांश देत आहे.
संस्थेचे मुख्य कार्यालय व आठ शाखांमधून आधुनिक सेवा पुरविल्या जात असून RTGS, NEFT, SMS बँकिंग व QR कोडसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. लवकरच लिंबू चौक परिसरात नवीन शाखा सुरू करण्यात येणार असून चंदूर (आभार फाटा) येथील स्वमालकीच्या इमारतीत शाखा स्थलांतरित करण्यात येणार आहे.
“माध्यम बचतीचे, बचतीतून प्रगतीचे, प्रत्येकास खंबीर पाठिंब्याचे” या ब्रीदवाक्यानुसार ग्राहकांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा संकल्प संस्थेने केला असून आकर्षक ठेव व कर्ज योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष मदनरावजी कारंडे यांनी केले आहे.
यावेळी शिरीष कांबळे (उपाध्यक्ष), सुनील पाटील, गजानन कडोलकर, भगवान कांबुरे, विजय बाबर, संजय घायतीडक, कल्लेश्वर वाघमोडे, सचिन शिंदे, सौ. बबिता माछरे, श्रीमती दिशा जाधव, शिवाजी कारंडे, संजय झुंजकर, कादर तहशिलदार, शितल दत्तवाडे, राजेंद्र पारीक, संदीप जाधव, विजय पाटील, शशिकांत राक्षे, यशवंत दळवी, सुनील शिंदे, दिनेश रेंदाळकर (जनरल मॅनेजर), भारत गिड्डे (असिस्टंट जनरल मॅनेजर) उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा