ICHMH51NEWS.IN
9921600800

कन्या महाविद्यालयात सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न…. बी.ए.भाग ३,बी.कॉम भाग ३,एम कॉम भाग २ च्या विद्यार्थिनींना महाविद्यालयातून निरोप…..

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कन्या महाविद्यालयात सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न….
बी.ए.भाग ३,बी.कॉम भाग ३,एम कॉम भाग २ च्या विद्यार्थिनींना महाविद्यालयातून निरोप…..

इचलकरंजी
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयातील बी.ए. भाग तीन, बी.कॉम भाग तीन, आणि एम कॉम भाग दोनच्या विद्यार्थिनींना पुढील आयुष्यसाठी शुभेच्छा देण्यासाठी एका विशेष सदिच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो.डॉ. त्रिशला कदम मॅडम उपस्थित होत्या.
त्यांनी विद्यार्थिनींना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देताना कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावरती आपले आयुष्य सुंदर बनवा, असा मोलाचा सल्ला दिला.

याशिवाय माजी विद्यार्थिनी संघटनेच्या अध्यक्ष सौ स्मिता बुगड तसेच माजी विद्यार्थिनी संघटनेच्या सदस्य माननीय सईदा कच्छी, माननीय शाहीन चौगुले यांनीही यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयातील सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांनी यावेळी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. आपले महाविद्यालय नेहमीच आपल्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही दिली.

यावेळी अनेक विद्यार्थिनींनी आपली मनोगत व्यक्त केली आणि आपल्या महाविद्यालयाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. महाविद्यालयाने दिलेले ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार आम्ही आयुष्यभर जपणार आहोत, अशी ग्वाही यावेळी या विद्यार्थिनींनी दिली.

या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. अनिता आंबोकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. शाहीन फकीर आणि प्रा. निकिता बडे यांनी केले तर आभार प्रा. अंकुश कुरणे यांनी मानले.

यावेळी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित होते.

निरोप समारंभात बोलताना प्रा त्रिशला कदम
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा