केपीएल सत्र ८ स्पर्धा उत्साहात; गणाकार वॉरियर्स विजेते
इचलकरंजी:
कोष्टी प्रीमियर लीग (केपीएल) २०२६ सत्र ८ अंतर्गत आयोजित डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा जल्लोषात पार पडली. राज्यभरातून मिळालेल्या प्रतिसादामुळे स्पर्धेत १० संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामन्यात टिम गणाकार वॉरियर्सने उत्कृष्ट कामगिरी करत टिम कांबळे स्विगर्सवर विजय मिळवून डायनॉस्टार चषक पटकावला. कांबळे स्विगर्स उपविजेते ठरले, तर टिम लोले चॅलेंजर तृतीय क्रमांकावर राहिला आणि टिम झेनिथला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. महिला गटात खारगे टीम विजेती ठरली.
वैयक्तिक पुरस्कारांमध्ये हर्ष आमणे ‘प्लेअर ऑफ द सिरीज’, पंकज डंबाळ ‘बेस्ट बॅट्समन’, नरेंद्र म्हेतर ‘बेस्ट बॉलर’, मंगेश ढवळे ‘बेस्ट फील्डर’ तर अनिकेत साखरे ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरले.
बक्षीस वितरण सोहळ्यास उद्योगपती शैलेश व अभिजीत सातपुते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धेच्या यशासाठी आयोजक व कमिटी सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.
विजेत्या संघास पारितोषिक वितरण करताना शैलेश सातपुते व अभिजित सातपुते
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





