ICHMH51NEWS.IN
9921600800

CIS चषक २०२६ : इचलकरंजीत शालेय जलद बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

CIS चषक २०२६ : इचलकरंजीत शालेय जलद बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न

https://youtube.com/shorts/sueuJYyA84M?feature=shared

इचलकरंजी :
 चेस असोसिएशन इचलकरंजीच्या मान्यतेने लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी, केन चेस अकॅडमी व मास्टर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित CIS चषक २०२६ अंतर्गत शालेय निमंत्रित जलद बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. मंगळवार, ३१ मार्च रोजी लायन्स ब्लड बँक, दाते मळा येथे झालेल्या या स्पर्धेत १२ शाळांमधील एकूण १०५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
स्पर्धा लहान (१ ली ते २ री), मध्यम (३ री ते ४ थी) व मोठा (५ वी ते ८ वी) अशा तीन गटांमध्ये स्विस लीग पद्धतीने ७ फेऱ्यांत आंतरराष्ट्रीय नियमांनुसार खेळविण्यात आली. उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ लायन्स क्लबचे अध्यक्ष संदीप सुतार, कृष्णावतार भराडिया, महेंद्र बालर, केन चेस अकॅडमीचे रोहित पोळ व मास्टर चेस अकॅडमीचे विजय सलगर यांच्या हस्ते पार पडला.
लहान गटात कोळी नक्षत्र, राज गावडे व युगंधर कुंभार, मध्यम गटात हर्ष मादनाईक, केदार चौगुले व अद्विक पवार, तर मोठ्या गटात दक्ष कारदगे, वरुण गिरमल व रितेश वठारे यांनी अनुक्रमे विजेतेपद पटकावले. विजेत्यांना रोख पारितोषिके व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट मुलींमध्ये लहान गटात स्वरा मातले व ओमिता मानगावकर, मध्यम गटात सोनल कुंभार व पूर्वी कोळी, तर मोठ्या गटात पलक मिश्रा व रिद्धी वाघमोडे यांचा गौरव करण्यात आला.
याशिवाय इयत्तानिहाय व प्रत्येक शाळेतील उत्कृष्ट खेळाडूंना एकूण ४५ सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके प्रदान करण्यात आली. सौ. गंगामाई विद्यामंदिर, श्री बालाजी विद्यामंदिर, समर्थ विद्यामंदिर यांसह विविध शाळांचा सहभाग उल्लेखनीय ठरला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राज्य पंच विजय सलगर, राष्ट्रीय पंच रोहित पोळ यांच्यासह अस्मिता नलवडे, अथर्व तावरे, करण दबडे, आदित्य कोळी व रुद्र माने यांनी काम पाहिले. स्पर्धेला पालक, विद्यार्थी व शिक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
CIS चषक २०२६ शालेय जलद बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना संदीप सुतार,कृष्णा भराडिया,महेंद्र बालर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा