ICHMH51NEWS.IN
9921600800

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता सातवी स्कॉलरशिप मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता सातवी स्कॉलरशिप मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न 

इचलकरंजी :
येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेस बसलेल्या विद्यार्थिनींसाठी आयोजित शहरस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात पार पडली.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून शासनाने इयत्ता चौथी व सातवीसाठी स्कॉलरशिप परीक्षा सुरू केली असून, विद्यार्थिनींची तयारी योग्य दिशेने व गुणवत्तापूर्ण व्हावी या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेत मराठी, बुद्धिमत्ता व गणित या विषयांसाठी तज्ज्ञ शिक्षक म्हणून राजेंद्र घोडके व उमेश नाळे यांनी मार्गदर्शन केले, तर इंग्रजी विषयासाठी अजित शेट्टी यांनी विद्यार्थिनींना उपयुक्त सूचना दिल्या.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका ए. एस. काजी, उपमुख्याध्यापिका व्ही. एस. लोटके, पर्यवेक्षक एस. एस. कोळी व पर्यवेक्षिका एन. एम. कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेचे नियोजन आर. एम. गरड यांनी केले.
सदर कार्यशाळेस शहरातील विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने कार्यक्रम यशस्वी ठरला.

मार्गदर्शन करताना शिक्षक

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा