ICHMH51NEWS.IN
9921600800

नाट्यगृह,क्रीडांगण दुरुस्तीसह विविध विकासकामांचे उद्घाटन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नाट्यगृह,क्रीडांगण दुरुस्तीसह विविध विकासकामांचे उद्घाटन

इचलकरंजी
   इचलकरंजी शहराचे आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या इचलकरंजी शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
   यामध्ये प्रामुख्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौक हा रस्ता बांधणी,
श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह नुतनीकरण करणे आणि अण्णाभाऊ साठे क्रिडांगण कंपौंड दुरुस्ती करणे
या कामांचा समावेश आहे.
   या सर्व कामांचा शुभारंभ आमदार डॉ.राहुल आवाडे यांच्या हस्ते आणि माजी आमदार प्रकाश आवाडे , माजी आमदार सुरेश हाळवणकर,
महापौर उदय धातुंडे, आयुक्त
पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
  यावेळी सभागृह नेते विठ्ठल चोपडे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, महिला बालकल्याण सभापती रुपाली सातपुते, शिक्षण सभापती विद्या साळुंखे, मागासवर्गीय कल्याण समिती सभापती रुबन आवळे, प्रभाग समिती सभापती सुशांत कलागते, नगरसेवक रवी रजपुते, राजु बोंद्रे,अमरजित जाधव ,संतोष शेळके, योगेश पाटील, राजु पुजारी, प्रकाश दत्तवाडे, मारुती पाथरवट, नगरसेविका धृवती दळवाई, रुपा बुगडे, शशिकला कवडे, नुतन मुथा, सुरेखा जाधव, मनिषा नवनाळे, अमृत भोसले, दिलीप मुथा, प्रमोद बचाटे, शेखर शहा , प्रशांत नवनाळे आदी उपस्थित होते.

नाट्यगृह दुरुस्ती कामाचे उद्घाटन करताना महापौर उदय धातूंडे व पदाधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा