ICHMH51NEWS.IN
9921600800

डॉ जयसिंगराव पवार यांच्याकडून वस्तुनिष्ठ इतिहासाची मांडणी-प्रा.टी एस पाटील

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ जयसिंगराव पवार यांच्याकडून वस्तुनिष्ठ इतिहासाची मांडणी-प्रा.टी एस पाटील

इचलकरंजी:

 डॉ.जयसिंगराव पवार यांनी आपल्या इतिहास संशोधनातून वस्तुनिष्ठ इतिहासाची मांडणी केली. पुराव्याशिवाय इतिहास लेखनाला अर्थ नसतो. याचे सतत भान ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांपासून राजर्षी शाहूमहाराजांपर्यंत मराठे शाहीचा अतिशय सखोल अभ्यास डॉ .जयसिंगराव पवार यांनी केला. त्याच पद्धतीने आधुनिक महाराष्ट्रातील सर्व चळवळींचा , सामाजिक आंदोलनांचाही सूक्ष्म अभ्यास करून त्यांनी साधन सिद्ध इतिहास लिहिला. सर्वांगीण समतेचा धागा त्यांनी ओळखला व तो इतिहास लिहिला.म्हणूनच त्यांचे इतिहास लेखन व संशोधन अचूक व सर्वमान्य ठरले. त्यांच्या इतिहास संशोधन व लेखन कार्यासाठी पुढील पिढ्यानी त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत, असे मत इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक प्राचार्य डॉ.टी.एस. पाटील यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने आयोजित व्याख्यानात ” डॉ. जयसिंगराव पवार यांची इतिहासदृष्टी ” या विषयावर बोलत होते. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून जयसिंगराव पवार यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करून समाजप्रबोवादी प्रबोधिनीशी त्यांचे ऋणानुबंध स्पष्ट केले. शशांक बावचकर यांनी पाहुण्यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले.

प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील म्हणाले, डॉ. जयसिंगराव पवार यांची ग्रंथसंपदा मोठी आहे. पाठ्यपुस्तकातून त्यांनी खरा इतिहास आणला. इतिहास परिषदेची आणि महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीची स्थापना करून त्यांनी त्या माध्यमातून ऐतिहासिक स्वरूपाचे काम केले. राजर्षी शाहू महाराज आणि त्यांचे कृतिकार्य त्यांनी जगभर नेले. डॉ. जयसिंगराव पवार यांनी मराठेशाही च्या इतिहासातील अनेक नायकांवर विस्तृत लेखन केले. इतिहासातील सर्वननायक त्यांच्या काळाच्या प्रवाहाबरोबर होतेच. पण ते प्रवाहाबरोबर वाहत गेले नाहीत.त्यांनी त्या काळालाच घडवण्यासाठी अफाट प्रयत्न केले. हे जयसिंगराव पवार यांनी स्पष्ट केले.संशोधनावरचा विश्वास आणि सत्यकथनाचे महत्त्व हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव होता. प्राचार्य डॉ.पाटील यांनी डॉ. जयसिंगराव पवार यांच्या समग्र लेखनाचा विस्तृत आढावा घेतला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे लिहायला घेतलेले मात्र अपूर्ण राहिलेले चरित्र त्यांच्या कन्या व इतिहास संशोधक डॉ.मंजुश्री पवार यांनी पूर्ण करावे अशी अपेक्षाही व्यक्त केली. या व्याख्यानास जिज्ञासू मंडळींचा चांगला प्रतिसाद मिळाला. पांडुरंग पिसे यांनी आभार मानले.

मनोगत व्यक्त करताना प्रा टी एस पाटील व्यासपीठावर प्रसाद कुलकर्णी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा