सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी गुन्हा दाखल
इचलकरंजी:
सोशल मीडियावर आक्षेपार्ह व धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कबीर खुदबुद्दीन हजारी (वय ४६, रा. प्रियदर्शनी कॉलनी, कबनूर, ता. हातकणंगले) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषीकेश भोसले (पूर्ण नाव व पत्ता अपूर्ण) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारास एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर संबंधित व्यक्तीने वादग्रस्त व आक्षेपार्ह स्वरूपाची टिप्पणी केल्याचा आरोप आहे. या पोस्टमुळे धार्मिक भावना दुखावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





