बालविवाह प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
इचलकरंजी :
अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी राकेश ज्योतीराम नलवडे, ज्योतीराम सीताराम नलवडे, फुलाबाई ज्योतीराम नलवडे (रा. एरंडोली, ता. मिरज, जि. सांगली) तसेच अशोक कोंडेकर व अमृता अशोक कोंडेकर (रा. आडी, ता. निपाणी, जि. बेळगाव) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ डिसेंबर २०२४ रोजी रांगोळी येथील एका ठिकाणी संबंधित मुलीचा विवाह लावण्यात आल्याची घटना घडली. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही संबंधितांनी संगनमताने हा विवाह लावल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा प्रथम निपाणी ग्रामीण पोलीस ठाणे (कर्नाटक) येथे झिरो नंबरने नोंदविण्यात आला होता. त्यानंतर पुढील तपासासाठी प्रकरण वर्ग करण्यात आले असून, सध्या शिवाजीनगर पोलीस ठाणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





