ICHMH51NEWS.IN
9921600800

मतदार यादी पुनर्रनिरीक्षणासाठी शिवसेनेचे स्वतंत्र बीएलओ नियुक्त होणार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मतदार यादी पुनर्रनिरीक्षणासाठी शिवसेनेचे स्वतंत्र बीएलओ नियुक्त होणार

इचलकरंजी:
मतदार यादी पुनरनिरीक्षण अभियानात एकही नागरिक वंचित राहू नये, यासाठी प्रत्येक बूथवर शिवसेनेच्या वतीने स्वतंत्र बीएलओ (BLO) नेमण्यात येणार असल्याची माहिती रवींद्र माने यांनी दिली.
इचलकरंजी येथील मातोश्री मुख्यालयात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा गोकुळचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर होते.
सध्या राज्यात मतदार यादी पुनरनिरीक्षण मोहीम सुरू असून, एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार हातकणंगले लोकसभा मतदारसंघात बूथनिहाय बीएलओ नेमण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या पडताळणी प्रक्रियेत काही ठिकाणी माहिती संकलनात गोंधळ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराची अचूक नोंद राहावी, यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
रवींद्र माने म्हणाले, “एकही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी गावागावात व बूथनिहाय लक्ष केंद्रित करून आवश्यक ती माहिती आयोगाच्या प्रतिनिधींना द्यावी.”
यावेळी डॉ. सुजित मिणचेकर यांनीही अभियान प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन केले. “प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचून लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले.
बैठकीस शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पुंडलिक जाधव, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशाली डोंगरे, उपजिल्हाप्रमुख विजयसिंह स्वामी, तालुकाप्रमुख अजित सुतार, युवासेना जिल्हाप्रमुख निशिकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे तसेच पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

मतदार यादी पुनर्रनिक्षण बैठकीत बोलताना जिल्हाप्रमुख रविंद्र माने,माजी आमदार सुजित मिणचेकर व पदाधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा