इचलकरंजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ४६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा
इचलकरंजी
राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि स्वतः शेवटी ०६ एप्रिल १९८० रोजी ‘भारतीय जनता पार्टी’ नावाच्या वटवृक्षाचे बीज रुजले आणि कोट्यावधी कार्यकर्त्यांनी आपल्या त्याग, समर्पण आणि निष्ठेने या बीजाची मशागत केली, त्यातूनच आज भाजपा परिवार जगातील सर्वात मोठे राजकीय संघटन म्हणून उदयास आले आहे. आज भारतीय जनता पार्टी इचलकरंजी स्थापना दिवसा निमित्त इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच भारतमाता फोटोचे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन प्रमोद मिराशी व इचलकरंजी पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे, ग्रामीण मंडल अध्यक्ष बाळसाहेब माने यांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या ४६ वर्षांमधील भाजपाचा प्रवास म्हणजे राष्ट्रभक्ती, जनसेवा आणि हिंदुत्व या त्रिवेणी मार्गावरील गौरवशाली इतिहास आहे. सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, जिल्हा बौद्धिक प्रमुख प्रमोद मिराशी बोलताना त्यांनी भारतीय जनता पार्टीची कशा पद्धतीने उभारणी केली याची माहिती दिली. आजची पार्टी उभा आहे ती जुन्या कार्यकर्त्यांच्या त्यागातूनच उभा राहिला असून यापुढे देखील पार्टीच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाला कशा पद्धतीने न्याय मिळेल व राष्ट्र कसे पुढे जाईल याचाच विचार मांडला जात आहे. आता देखील भाजपचा कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांना कसा न्याय मिळेल याचाच विचार करणे गरजेचे असून भाजपाच्या सेवा संघर्ष व त्याग त्रिसूत्रीच्या माध्यमातून कार्यरत राहणे हे गरजेचे आहे तसेच ‘विकसित भारत घडवण्यासाठी भाजपा परिवार अविरतपणे कार्यरत राहील असे नमूद केले. यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या यांनी भारतीय जनता पार्टी हि सर्वसामन्य कार्यकत्यांची पार्टी असून भाजपा कार्याची माहिती दिली.
तसेच ‘भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने स्थापना दिना निमित्त मोटर सायकल रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून काढून महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यता आले.शहरातील प्रमुख चौका मध्ये आकर्षक रांगोळी काढून सजावट करण्यात आली.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, शहर पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक नगरसेविका, सर्व लोकप्रतिनिधी यांनी आपापल्या घरांवर भाजप पक्षाचा ध्वज फडकवून स्थापना दिवस उत्साहात साजरा केला.
यावेळी महिला मोर्चा पूर्व मंडल अध्यक्षा सौ.सीमा कमते, पश्चिम मंडल महिला अध्यक्षा सौ.सपना भिसे, पूर्व युवा मोर्चा अध्यक्ष सचिन पवार पश्चिम युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद बचाटे कार्यक्रमाचे संयोजक राजेंद्र पाटील, तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका, शहर पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, ग्रामीण पदाधिकारी, सर्व पंचायत समिती सदस्य, सर्व आघाडी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
ध्वजारोहण करताना महापौर उदय धातूंडे व भाजप पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






