ICHMH51NEWS.IN
9921600800

मनपा शाळांची शिक्षण समिती सभापती विद्या साळुंखेनी केली अचानक पाहणी; शैक्षणिक व भौतिक सुविधांवर भर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मनपा शाळांची शिक्षण समिती सभापती विद्या साळुंखेनी केली अचानक पाहणी; शैक्षणिक व भौतिक सुविधांवर भर

इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण समितीने सक्रिय पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत शिक्षण समितीच्या सभापती सौ. विद्या मनोज साळुंखे व उपसभापती सौ. पूनम सचिन माळी यांनी शहरातील विविध मनपा शाळांना अचानक भेट देत शैक्षणिक व भौतिक सुविधांची पाहणी केली.
या पाहणीदरम्यान हुतात्मा बाबू गेनू विद्यालय (क्र. २८), रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन (क्र. २७), छत्रपती संभाजी विद्यामंदिर (क्र. ३५) आणि बाळकृष्ण बुवा विद्यामंदिर (क्र. ७) येथे प्रत्यक्ष वर्गात जाऊन अध्यापन प्रक्रिया, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि शैक्षणिक साधनसामग्रीची तपासणी करण्यात आली. अध्यापन अधिक परिणामकारक व आधुनिक करण्यासाठी शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
पाहणीदरम्यान काही शाळांमध्ये अपुऱ्या वर्गखोल्या, डिजिटल लॅबचा अभाव, पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था, स्वच्छतागृहांची दुरवस्था तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज यांसारख्या समस्या निदर्शनास आल्या. या त्रुटी दूर करण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
शाळांमध्ये संगणकांची संख्या वाढवणे, स्वतंत्र डिजिटल कक्ष उभारणे, शिक्षकांना तांत्रिक प्रशिक्षण देणे, तसेच विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय जीर्ण इमारतींची दुरुस्ती, नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम आणि पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर यंत्रणा बसवण्याबाबतही संबंधित विभागांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
मनपा शाळांचा सर्वांगीण विकास करून विद्यार्थ्यांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे हेच उद्दिष्ट असल्याचे सभापती व उपसभापती यांनी यावेळी स्पष्ट केले.
या प्रसंगी नगरसेविका वैशाली पवार, मोनाली मांजरे, मनीषा कुपटे, नगरसेवक राजू पुजारी तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार व अमृतमामा भोसले आदी उपस्थित होते.
शाळांची पाहणी करताना सभापती विद्या साळुंखे व इतर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा