जयवंत महाविद्यालयाच्या रोहन आवळेचे रग्बी स्पर्धेत घवघवीत यश
इचलकरंजी :
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रग्बी (7’s आणि 15’s) पुरुष व महिला चॅम्पियनशिप 2025-26 स्पर्धा ओडिशातील भुवनेश्वर येथे दि. 2 ते 6 एप्रिल 2026 या कालावधीत उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांचे आयोजन कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अभिमत विद्यापीठामार्फत करण्यात आले होते.
या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या पुरुष आणि महिला संघांनी उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. या यशात जयवंत महाविद्यालयाचा विद्यार्थी रोहन एवन आवळे याचा मोलाचा वाटा राहिला.
रोहनने ‘फॉरवर्ड – टायटहेड प्रॉप – पोजिशन’मध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाला उपविजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या दमदार खेळामुळे संघाची कामगिरी अधिक भक्कम झाली.
रोहनच्या या यशाबद्दल जयवंतराव आवळे शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व माजी सामाजिक न्याय मंत्री जयवंतराव आवळे, संस्थेचे अध्यक्ष संजय (दादा) आवळे, कार्याध्यक्ष सौ. उज्वला आवळे, माजी आमदार राजू (बाबा) आवळे, प्रशासन अधिकारी संजय भोरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलावर जमादार यांनी त्याचे अभिनंदन करून कौतुक केले.
या यशासाठी शारीरिक शिक्षण संचालक डॉ. एवन आवळे यांचे मार्गदर्शन लाभले.
रोहन आवळे चषकासह
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






