ICHMH51NEWS.IN
9921600800

आपटे वाचन मंदिरात बाल वाचन संस्कार शिबिराचे आयोजन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आपटे वाचन मंदिरात बाल वाचन संस्कार शिबिराचे आयोजन

इचलकरंजी :
शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी आपटे वाचन मंदिराच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही इयत्ता ७ वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी बाल वाचन संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गुरुवार दि. २३ एप्रिल २०२६ ते बुधवार दि. २९ एप्रिल २०२६ या कालावधीत ग्रंथालयाच्या बजाज सभागृहात दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत पार पडणार आहे.
सध्याच्या मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय कमी होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, विविध वाचन प्रकारांची माहिती मिळावी तसेच वाचन संस्कृती जपली जावी, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरादरम्यान तज्ञ संचालक व गुणवंत शिक्षक विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व व पद्धती याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराच्या समारोप कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याला ग्रंथालयाच्या वतीने एक पुस्तक भेट म्हणून दिले जाणार आहे.
या शिबिरासाठी प्रवेश शुल्क रु. ३० इतके असून सहभागी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांचे शिफारस पत्र आवश्यक आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी सोमवार दि. २० एप्रिल २०२६ पर्यंत आपली नावे ग्रंथालयात नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा