ICHMH51NEWS.IN
9921600800

कोयत्याने हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोयत्याने हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

शहापूर :
शहापुर पोलीस ठाणे येथे नातेवाईकांतील वादातून कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अर्जुन प्रकाश गोसावी (वय २७, रा. साईनगर, राधानगरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ११एप्रिल रोजी रात्री ८ वाजता शहापुर येथील म्हसोबा मंदिराजवळील मोकळ्या मैदानात ही घटना घडली. आरोपी अनिल जयसिंग गोसावी व सुरेश जयसिंग गोसावी (दोघे रा. कागल) यांनी फिर्यादीला धमकी देत मारहाण केली.
फिर्यादी आपल्या बेपत्ता बहिणीचा शोध घेत असताना आरोपींनी “शोध घेऊ नकोस, जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली. त्यानंतर शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. दरम्यान, अनिल गोसावी याने कोयत्याने डोक्यावर वार करून फिर्यादीला जखमी केले पुढील तपास सुरू आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा