ICHMH51NEWS.IN
9921600800

४० हजारांच्या खंडणीस नकार दिल्याने कोयत्याने दहशत माजवत तोडफोड प्रकरणी, ९ जणांवर गुन्हा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

४० हजारांच्या खंडणीस नकार दिल्याने कोयत्याने दहशत माजवत तोडफोड प्रकरणी, ९ जणांवर गुन्हा

इचलकरंजी :
शहरात खंडणीसाठी दहशत माजवल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, ४० हजार रुपयांची मागणी नाकारल्याच्या रागातून आरोपींनी फिर्यादीवर हल्ला करून घराजवळ तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवराज उर्फ दिगंबर माने (रा. ताराराबाई रोड, इचलकरंजी) हे दि. १२ एप्रिल रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास महासत्ता चौक, शांतिनाथ शाळेजवळ थांबले असताना आरोपी उमेश आरवोळे व त्याच्या साथीदारांनी जमाव करून ४० हजार रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना मारहाण केली.
त्यानंतर दि. १३ एप्रिल रोजी रात्री सुमारे ९.५० वाजता आरोपींनी फिर्यादीच्या घराजवळ येत पुन्हा दहशत माजवली. कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी घराच्या दरवाजावर वार करून तसेच घराबाहेर उभी असलेली मोटारसायकल पाडून तिचे नुकसान करण्यात आले. यावेळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणी उमेश आरवोळे, ओंकार कदम, योगेश बडोदेकर, मोहिदीन जमादार, वैभव कोरवी, शिवराज उर्फ प्रेम चनविरे, अभि मंत्री, ओमकार काजवे व शकील गवंडी (पत्ता अपूर्ण) यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खंडणी, मारहाण, दहशत निर्माण करणे तसेच शासकीय बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलमांनुसार कारवाई करण्यात येत आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक माने करत आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा