कॉ. के. एल. मलाबादे यांना स्मृतिदिनी पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे अभिवादन
इचलकरंजी :
पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने माजी आमदार कॉ. के. एल. मलाबादे यांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त संघटनेच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले. संघटनेचे सचिव अण्णा गुंडे यांच्या हस्ते मलाबादे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बोलताना अण्णा गुंडे म्हणाले, कॉ. मलाबादे यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. गोरगरीब व कष्टकरी वर्गाला न्याय मिळावा यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. आमदारकीच्या काळात इचलकरंजी शहरात पाणीटंचाई दूर करण्यासाठी अनेक बोरवेल उभारण्याचे काम त्यांनी केले, ज्याचा उल्लेख आजही नागरिकांकडून केला जातो. शहरातील मालक व कामगार वर्गात त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. तसेच संघटनेला त्यांनी केलेली मदतही अविस्मरणीय असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी संघटनेचे संचालक अमोल मुसडे, महेश बावळे, भालचंद्र कांबळे, शिवानंद रावळ तसेच विक्रेते दादासो कांबळे, दत्ता चोगुले, नितीन तारदाळे आदी उपस्थित होते.
कॉ के एल मलाबादे यांना अभिवादन करताना पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





