ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत पाणीप्रश्नावर महापौरांवर विरोधकांचा हल्लाबोल; ४० दिवसांपासून विशेष सभा रखडली

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत पाणीप्रश्नावर महापौरांवर विरोधकांचा हल्लाबोल; ४० दिवसांपासून विशेष सभा रखडली

इचलकरंजी :

शहरातील तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त असताना महापौर निष्क्रिय असल्याचा आरोप करत विरोधकांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. सुळकुड पाणी योजना व पाणीपुरवठ्यावर चर्चा करण्यासाठी १७ नगरसेवकांच्या सह्यांचे पत्र देऊनही ४० दिवस उलटले, तरी विशेष सभा बोलावण्यात आलेली नाही.

आठ दिवसांतून एकदाच पाणी मिळत असल्याने नागरिक, विशेषतः महिला वर्ग संतप्त आहे. वारणा योजना रखडली, सुळकुड योजनेची माहिती अस्पष्ट, आणि ठोस उपाययोजना दिसत नसल्याने संताप वाढत आहे.

“महापौरांना पाणीप्रश्नाचे गांभीर्य आहे का?” असा सवाल करत विरोधकांनी आमदार-खासदारांच्या केवळ आश्वासनांचा कित्ता गिरवुन वेळ मारून नेण्याचे काम करू नये, तर ठोस कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा