ICHMH51NEWS.IN
9921600800

रोटरी क्लब इचलकरंजी व वेद इंडस्ट्रीज तर्फे रक्तदान शिबिर संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रोटरी क्लब इचलकरंजी व वेद इंडस्ट्रीज तर्फे रक्तदान शिबिर संपन्न
इचलकरंजी :
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व वेद इंडस्ट्रीज चंदूर युनिट व लक्ष्मी औद्योगिक वसाहत हातकणंगले येथे रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. वेद इंडस्ट्रीजच्या दोन्ही युनिटमध्ये झालेल्या शिबिरामध्ये तेथील कामगार व ऑफिस स्टाफने उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन 116 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. गरजू रुग्णांना रक्ताची  गरज ओळखून रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व वेद इंडस्ट्रीज चंदुर व लक्ष्मी औद्योगिक वसाहत यांच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले. शिबिरातील रुग्णांचे रक्त संकलन आधार ब्लड बँक इचलकरंजी येथील डॉक्टर्स व स्टाफ यांनी केले. या कार्यक्रमावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष पाटील, सेक्रेटरी चंद्रकांत मगदूम, महेश दाते, प्रकाश रावळ, संजय खोत, मनोज दाते, सुनिल सातपुते, शरद देसाई, डॉ. राजेश पवार, प्रकाश जमदाडे, वरद दाते सुनील दानोळे, सचिन पाटील आदी उपस्थित होते. यावेळी वेद इंडस्ट्रीजच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
फोटो-रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व वेद इंडस्ट्रीज यांच्यावतीने रक्तदान शिबिराप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष पाटील, सेक्रेटरी चंद्रकांत मगदूम, महेश दाते, संजय खोत, डॉ. राजेश पवार, मनोज दाते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा