मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजने अंतर्गत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही भुलथापांना बळी पडु नये:-
आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे
इचलकरंजी
महानगरपालिकेच्या वतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेच्या माध्यमातून विविध १७ संवर्गातील ८८ पदासाठी फक्त सहा महिने कालावधी करीताच प्रशिक्षणार्थी म्हणून पात्र व्यक्तीं संधी मिळणार आहे.
या विद्यार्थ्यांना सेवेत कायम करणेत येणार आहे अशी अफवा शहरात पसरवण्यात येत असल्याचे समजले असून सदर बाब अत्यंत गंभीर असून प्रशिक्षणार्थी यांची फसवणुक होण्याची शक्यता विचारात घेता तसेच पूर्ण पारदर्शी पद्धतीने संकेतस्थळावरील प्राप्त अर्जावर निवड होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या भुल थापांना
बळी पडु नये असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून करणेत येत आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







