ICHMH51NEWS.IN
9921600800

सहकार कायद्यात बदलांसाठी उच्चस्तरीय समिती; अशोकराव स्वामींचा समावेश

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सहकार कायद्यात बदलांसाठी उच्चस्तरीय समिती; अशोकराव स्वामींचा समावेश

मुंबई:
महाराष्ट्र शासनाने सहकार क्षेत्र अधिक सक्षम व पारदर्शक करण्यासाठी सहकारी संस्था अधिनियम,१९६० मध्ये सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची पुनर्रचना केली आहे. या समितीत महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांचा समावेश करण्यात आला आहे.
समिती सहकार क्षेत्रातील अडचणींचा अभ्यास करून निवडणूक प्रक्रिया, लेखापरीक्षण, व्यवस्थापन व पारदर्शकता वाढविण्यासाठी शिफारसी करणार आहे. बदलत्या आर्थिक व तांत्रिक परिस्थितीचा विचार करून धोरणात्मक सुधारणा सुचवल्या जाणार आहेत.
अशोकराव स्वामी यांच्या अनुभवामुळे वस्त्रोद्योग सहकारी संस्थांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या जातील. या समितीच्या शिफारसींमुळे सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा