ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत आजपासून मुख्य रस्ता अतिक्रमणमुक्ती मोहीम; पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी सामूहिक प्रयत्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत आजपासून मुख्य रस्ता अतिक्रमणमुक्ती मोहीम; पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी सामूहिक प्रयत्न

इचलकरंजी :
पंचगंगा नदीच्या प्रदूषणामुळे नदीकाठच्या गावकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता, इचलकरंजी महापालिकेकडून संपूर्ण पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. महापौर उदय धातूंडे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पंचगंगा प्रदूषणमुक्ती समितीने काळा ओढा बंद केल्याने त्यांचा राग स्वाभाविक असल्याचे सांगत महापौर म्हणाले, “फक्त इचलकरंजी शहराला टार्गेट करून हा प्रश्न सुटणार नाही. इचलकरंजीवासियांना सोबत घेऊन संपूर्ण पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.”
याबाबत पंचगंगा प्रदूषणमुक्ती समितीबरोबर चर्चा करण्यात येणार असून, प्रदूषण नियंत्रण महामंडळ व पर्यावरण मंत्र्यांचे मार्गदर्शन घेऊन प्रभावी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे महापौर धातूंडे यांनी स्पष्ट केले.
मुख्य रस्ता अतिक्रमणमुक्त मोहीम सुरू
इचलकरंजी शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी आजपासून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत सर्व नगरसेवकांना विश्वासात घेतले जाईल. नोंदणीकृत व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाईल, तर इतर व्यावसायिकांसाठीही जास्तीत जास्त पुनर्वसन करून मुख्य रस्ता पूर्णपणे रिकामा करण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले.
अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेत  आमदारांचा हस्तक्षेप होणार नाही. मुख्य रस्ता रिकामा करण्यावर आम्ही ठाम आहोत, असेही त्यांनी बजावले. राहदारीसाठी असलेल्या रस्त्यावर व्यावसायिक वाहने उभी राहिल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येईल.
यावेळी सतीश मुळीक, विठ्ठल चोपडे, तानाजी पोवार, रविंद्र माने, रवी रजपुते, प्रशांत नवनाळे, ओंकार सुर्वे, भाऊसो आवळे, मनोज साळुंखे, प्रमोद बचाटे, सचिन माळी आदी उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा