ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये द्वितीय क्रमांक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये द्वितीय क्रमांक

इचलकरंजी :
डीकेटीई संस्थेच्या बी.टेक. तृतीय वर्षातील सीएसई (एआय अ‍ॅण्ड एमएल) व एआयडीएस शाखेतील विद्यार्थ्यांनी कर्नाटक येथे आयोजित ‘रीकॉन १.०’ या राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. रुरल इंजिनिअरिंग कॉलेज, हलकोटी यांच्या वतीने आयोजित २४ तासांच्या या स्पर्धेत देशभरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला होता.
बापूराव कुंडले, सौरभ कुलकर्णी, जतिन दायमा आणि पावडी कनल या विद्यार्थ्यांच्या संघाने ‘एआय इन्व्हेंटरी फोरकास्टिंग सिस्टीम’ हा प्रकल्प सादर करत नवोन्मेषी दृष्टी, तांत्रिक कौशल्य आणि प्रभावी संघकार्याचे प्रदर्शन केले. मर्यादित वेळेत व्यवहार्य व उद्योगाभिमुख उपाय मांडल्याने परीक्षकांनी त्यांचे कौतुक केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांसह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
 हॅकॅथॉनमध्ये यश मिळविलेले डीकेटीईचे विद्यार्थी.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा