भाजप कोर कमिटीची बैठक; विधानपरिषदेसाठी २५ जणांच्या यादीत सुरेश हाळवणकरांचे नाव-मंत्री चंद्रकांतदादा पाटील
इचलकरंजी:
भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली असून, विधानपरिषदेसाठी पक्षाला ५ जागा मिळणार आहेत.या पार्श्वभूमीवर प्रत्येक जागेसाठी पाच अशा एकूण २५ संभाव्य उमेदवारांची यादी पक्षश्रेष्ठींना दिल्लीत पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या यादीमध्ये माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांचेही नाव समाविष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी निवडीसाठी पक्ष पातळीवर विचारमंथन सुरू असून, अंतिम निर्णय लवकरच होणार आहे
दरम्यान, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी इचलकरंजीत पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, विधानसभा निवडणुकीत आ. राहुल आवाडे यांच्यासाठी सुरेशराव हाळवणकर यांनी केलेल्या कामाची आणि दिलेल्या योगदानाची पक्ष निश्चितच दखल घेईल. त्यांच्या योगदानाचे बक्षीस त्यांना दिले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






