ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी येथे गांधी चौकात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे जाहीर वाचन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी येथे गांधी चौकात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे जाहीर वाचन

इचलकरंजी: संविधान परिवार आणि शिवशाहू आघाडीच्यावतीने इचलकरंजी येथे गांधी चौकात शिवाजी कोण होता पुस्तकाचे जाहीर वाचन करत परिवर्तनवादी संस्था – संघटना आणि पक्षांनी आमदार संजय गायकवाड आणि बागेश्वर बाबा विरोधात आपला निषेध संविधानिक पद्धतीने नोंदवला.

जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयचे राज्य समन्वयक संजय रेंदाळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कोमल माने, रिटा रॉड्रीग्युज आणि सौरभ पोवार यांनी पुस्तकातील निवडक भागाचे वाचन केले. सुनिल बारवाडे यांनी लेखक प्रशांत आंबी यांचे समर्थन करत राजकारणातील अभद्रतेचा निषेध व्यक्त करणारे मनोगत व्यक्त केले. समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी यांनी शिवाजी कोण होता पुस्तकाची निर्मिती कथा सांगत कठोर शब्दांत मांडणी केली.

माजी नगरसेवक अब्राहम आवळे, काॅंग्रेसचे शशांक बावचकर, महाराष्ट्र अंनिसचे बजरंग लोणारी, संविधान संवाद समितीचे जिल्हा सचिव अमोल पाटील, इस्माईल समडोळे, आनंदा गुरव आदिंनी घणाघाती भाषणे करत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

यावेळी राष्ट्र सेवा दल इचलकरंजी अध्यक्ष अनिल होगाडे, सुनिल स्वामी, सुषमा साळुंखे, भरमा कांबळे,सदा मलाबादे, पांडुरंग पिसे,वसंत कोरवी,युवराज शिंगाडे, उमेश पाटील, अजित मिणेकर, सीताराम शिंदे, उषा कोष्टी, युसुफ तासगावे, रुचिता पाटील, दामोदर कोळी, आरिफ पानारी, मुस्तफा शिकलगार , महेश खांडेकर आवर्जून उपस्थित होते.

एकत्र येऊया गटाचे समन्वयक किरण माळी यांनी आभार मानत २९ तारखेला संभाजी भगत यांच्या नागरी सत्कारासाठी समाजवादी प्रबोधिनी येथे येण्याचे निमंत्रण उपस्थितांना दिले.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा