अलायन्स हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक CVTS विभागाचा शुभारंभ
हृदय शस्त्रक्रियांसाठी इचलकरंजीत नवे दालन; मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते उद्घाटन
इचलकरंजी :
शहरातील आरोग्यसेवेला नवी दिशा देत अॅलायन्स मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये कार्डिओ-थोरॅसिक व व्हॅस्क्युलर सर्जरी (CVTS) विभागाची यशस्वी स्थापना करण्यात आली असून या विभागाचे उद्घाटन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी संचालक मंडळ, डॉक्टर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अत्याधुनिक सुविधा, ३० बेडचे सुसज्ज ICU, प्रगत मॉनिटरिंग सिस्टम आणि अनुभवी वैद्यकीय टीम यांच्या बळावर हा विभाग सुरू करण्यात आला आहे. जटिल हृदय शस्त्रक्रियेनंतर रुग्णांची सुरक्षितता आणि जलद पुनर्वसन यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.
या विभागाचे नेतृत्व हृदयरोगतज्ज्ञ डॉ. किशोर देवरे करत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक जटिल शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत. पुढील काळात ‘मिनिमली इन्वेसिव्ह’ तंत्रज्ञानाद्वारे छाती न फाडता बायपाससारख्या शस्त्रक्रिया करण्याची सुविधा येथे उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या पद्धतीमुळे रुग्णांना कमी वेदना व लवकर बरे होण्याचा फायदा होणार आहे.
डॉ. देवरे यांनी सांगितले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपचार ‘आयुष्यमान भारत’ व ‘ईएसआयसी’ योजनांअंतर्गत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
प्रकाश आवाडे यांनी आपल्या मनोगतात अॅलायन्स हॉस्पिटलच्या प्रगतीचे कौतुक करत ग्रामीण व उपनगरी भागातील रुग्णांना स्थानिक पातळीवर दर्जेदार उपचार मिळणे ही मोठी बाब असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे मोठ्या शहरांवरील अवलंबित्व कमी होईल, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. कित्तुरे यांनी प्रास्ताविक केले
यावेळी डॉ. राजकुमार पाटील, डॉ. मिठारी, डॉ. प्रिया कुलकर्णी, डॉ. मुकेश बाहेती, डॉ. अमोल भोरे, डॉ. किशोर देवरे, CEO आयेशा राऊत, डॉ. महेश बनकर, जनसंपर्क अधिकारी सदानंद गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित माजी मंत्री प्रकाश आवाडे व मान्यवर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







