इचलकरंजी आगारात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा
इचलकरंजी :
राज्य परिवहन (रा.प.) इचलकरंजी आगारात १ मे रोजी ६७ वा महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक सागर पाटील होते.
यावेळी अपघातमुक्त सुरक्षित सेवा बजावणाऱ्या चालकांचा सन्मान करण्यात आला. २५ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या १, २० वर्षे सेवा केलेल्या ३, १५ वर्षे सेवा केलेल्या ८, १० वर्षे सेवा केलेल्या ११ आणि ५ वर्षे सेवा केलेल्या १ अशा एकूण २४ कर्मचाऱ्यांना सुरक्षित सेवा बिल्ला व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच आगारासाठी उत्कृष्ट उत्पन्न मिळवून देणाऱ्या १० वाहकांचा आणि कार्यशाळेतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ५ कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला.
आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देत सुरक्षित, दर्जेदार व प्रवासी-केंद्रित सेवा देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी सुरक्षित सेवा बजावणाऱ्या चालकांचा सन्मान केला
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









