ICHMH51NEWS.IN
9921600800

विद्रोहाला संविधानाचे आणि कार्यकर्त्यांना प्रशिक्षणाचे अधिष्ठान आवश्यक – लोकशाहीर संभाजी भगत

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विद्रोहाला संविधानाचे आणि कार्यकर्त्यांना प्रशिक्षणाचे अधिष्ठान आवश्यक – लोकशाहीर संभाजी भगत

इचलकरंजी :
येथे १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल लोकशाहीर संभाजी भगत यांचा सत्कार उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात रूचिता पाटील आणि शाहीर संजय जाधव यांनी सादर केलेल्या परिवर्तनवादी गीतांनी झाली. किरण माळी यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर सुनिल स्वामी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली.
बजरंग लोणारी यांनी कार्यक्रमामागील प्रयोजन मांडले, तर क्रांती आवळे यांनी निवडीबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या. विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड झालेबद्दल लोकशाहीर संभाजी भगत यांचा फुले पगडी, संविधान फ्रेम, पुस्तक संच भेट देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे राजेंद्र कुंभार यांनी विद्रोही विचारांची परंपरा अधोरेखित करताना बसवण्णा यांना पहिले विद्रोही मानले. “जो श्रम करतो त्यानेच विचार मांडले पाहिजेत आणि वचने लिहिली पाहिजेत.” असे सांगत त्यांनी वचन परंपरेचे महत्त्व विशद केले. त्यांनी अर्थवाही शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान आणि संविधानाचा दैनंदिन वापर यावर भर दिला. “संविधानावर अनेक हल्ले झाले असले तरी ते जिवंत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे,” असेही ते म्हणाले.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे मार्गदर्शक धनाजी गुरव यांनी यांचेकडून कार्यक्रमात बालक, कुमार, किशोर आणि युवा यांच्यासाठी विशेष उपक्रम राबवण्याची गरज व्यक्त करण्यात आली. व्यापक चळवळ उभारण्यासाठी विविध सामाजिक गटांमध्ये संवाद वाढवण्यावरही भर देण्यात आला पाहिजे असे मत व्यक्त केले.
माजी आमदार राजीव आवळे यांनी अध्यक्षस्थानावरून अन्याय-अत्याचाराविरोधात सम्यक विद्रोहाची गरज असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय रेंदाळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन रिटा रॉड्रिग्युज यांनी केले.
या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते उदयसिंह पाटील, अनिल होगाडे, सदा मलाबादे, भरमा कांबळे, अब्राहम आवळे, महेश खांडेकर, सीताराम शिंदे, रेशमा खाडे, सुषमा साळुंखे, सुनिल बारवाडे, युसुफ तासगावे, पांडुरंग पिसे, प्रसाद कुलकर्णी, स्नेहल माळी, शरद वास्कर, नौशाद शेडबाळे, आदिंसह सामाजिक, सांस्कृतिक आणि परिवर्तनवादी विचारांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मनोगत व्यक्त करताना संभाजी भगत
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा