ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ उत्साहात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ उत्साहात

इचलकरंजी:
 महाराष्ट्र दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या तसेच अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समारंभास स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे, नगरसेवक रवी रजपुते, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांच्यासह उपायुक्त नंदु परळकर, अशोक कुंभार, शिक्षण अधिकारी बी.एम. कासार, माजी सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे, मुख्याध्यापक शंकर पोवार आणि माजी शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर उपस्थित होते.
यावेळी महानगरपालिकेचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी-कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान तसेच सरस्वती हायस्कूलचे विद्यार्थी, विद्यार्थीनी व शिक्षक जितेंद्र कुलकर्णी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीपर वातावरणात हा समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन करताना आयुक्त पल्लवी पाटील,महापौर उदय धातूंडे व इतर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा