ICHMH51NEWS.IN
9921600800

डॉ. किरण पाटील यांचा राज्यस्तरीय गौरव; डिजिटल उपक्रमांची दखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ. किरण पाटील यांचा राज्यस्तरीय गौरव; डिजिटल उपक्रमांची दखल

इचलकरंजी :
भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी आणि इचलकरंजीचे सुपुत्र डॉ. किरण पाटील यांचा महाराष्ट्र शासनाच्या राज्यसेवा हक्क आयोगामार्फत विशेष गौरव करण्यात आला. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्या हस्ते त्यांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
बुलढाणा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना डॉ. पाटील यांनी राबविलेल्या “सहज प्रणाली” आणि “महसूल मित्र” या नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रमांची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला. या उपक्रमांमुळे सातबारा उतारे, जमिनीचे नकाशे, विविध शासकीय आदेश व कागदपत्रे मोबाईलवर सहज उपलब्ध झाली आहेत. ‘महसूल मित्र’ या व्हॉट्सअॅप चॅटबॉटमुळे नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ पद्धतीने मिळू लागल्या आहेत.
या उपक्रमांमुळे वेळ व खर्चाची बचत होऊन प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख झाले आहे. नागरिकांचा शासनावरील विश्वास दृढ करण्यास या उपक्रमांनी हातभार लावला असून, डॉ. पाटील यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

किरण पाटील यांचा सत्कार करताना मुख्य सचिव
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा