ICHMH51NEWS.IN
9921600800

महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन; इचलकरंजीत नागरिक मंचचा उपक्रम

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन; इचलकरंजीत नागरिक मंचचा उपक्रम

इचलकरंजी :
महाराष्ट्र दिनानिमित्त येथील महात्मा गांधी चौकातील हुतात्मा स्तंभास अभिवादन करून इचलकरंजी नागरिक मंचाच्या वतीने कार्यक्रम उत्साहात पार पडला. राज्य निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या वीरांना यावेळी भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
मनोगत व्यक्त करताना प्रसाद कुलकर्णी यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडलेली ‘रयतेचे राज्य’ ही संकल्पना आणि राजर्षी शाहू महाराजांची सामाजिक न्यायाची भूमिका यांचा विचार करून महाराष्ट्राने सर्वांगीण प्रगती साधावी, असे मत व्यक्त केले. या मूल्यांना प्रामाणिक प्रयत्नांची जोड मिळाल्यास महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांत अव्वल ठरू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे आणि महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करणारे यांना अभिवादन करताना संतपरंपरा व राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे भान प्रत्येक नागरिकाने ठेवावे, असे आवाहन करण्यात आले. लोकशाही व्यवस्थेत शासन-प्रशासन अधिक लोकाभिमुख होण्यासाठी नागरिकांच्या सक्रिय सहभागाची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले. या दृष्टीने इचलकरंजी नागरिक मंच सातत्याने कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या अनेक दशकांत महाराष्ट्राला उंचीवर नेणाऱ्या मान्यवरांच्या कार्याचा आदर्श घेऊन भविष्याची वाटचाल करणे गरजेचे असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. आजचे वास्तव आणि उद्याची उद्दिष्टे यांचा समतोल साधल्यास प्रगतीची वाट अधिक सुकर होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले.
या कार्यक्रमास उमेश पाटील, राजू कोन्नुर, दीपक लाटणे, शशी सुतार, विद्यासागर चराटे, राजू आरगे, श्रीकांत भंडारी, नितीन ठिगळे, दीपक पंडित,शितल मगदुम,सचिन कांबळे, राकेश शेटके, महेंद्र जाधव, उदयसिंह निंबाळकर, हरिष देवाडीगा, किरण परीट, युवराज कांबळे, कुणाल भोसले, अभिजित पटवा आदी उपस्थित होते.

हुतात्मा स्तंभास अभिवादन करताना इनामचे सदस्य
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा