ICHMH51NEWS.IN
9921600800

श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्सचा १००% निकाल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्सचा १००% निकाल

इचलकरंजी :
गंगा एज्युकेशन सोसायटी संचलित श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्सने इयत्ता बारावीच्या परीक्षेत यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले. सातत्यपूर्ण गुणवत्तेसाठी ओळख असलेल्या या महाविद्यालयाने पुन्हा एकदा उत्कृष्ट निकाल देत आपली छाप अधोरेखित केली.
महाविद्यालयातील कु. दर्शन भन्साळी हिने ९७.१७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. उन्नती सारडा आणि कु. प्रतीक पाटील यांनी प्रत्येकी ९७ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. विशेष म्हणजे सहा विद्यार्थ्यांनी अकाउंटस् विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवले, तर गणित व आयटी विषयातही प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांनी शतप्रतिशत गुण मिळवले.
याशिवाय ३४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले असून अकाउंटस् विषयात ३७ विद्यार्थ्यांनी ९५ पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. इकॉनॉमिक्स, ओसीएम, गणित, आयटी आणि एस.पी. या सर्व विषयांत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. कोणत्याही ट्यूशनशिवाय महाविद्यालयीन मार्गदर्शनावर आधारित तयारी ही या यशामागील प्रमुख बाब ठरली आहे.
संस्थेचे अध्यक्ष ए. आर. तांबे व समन्वयकांसह शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा