ICHMH51NEWS.IN
9921600800

सक्तीच्या ऑनलाईन नोंदणीमुळे यंत्रमागधारकांची लूट? विज सवलतीच्या नावाखाली एजंटराज; तात्काळ रद्द करण्याची संतप्त मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सक्तीच्या ऑनलाईन नोंदणीमुळे यंत्रमागधारकांची लूट? विज सवलतीच्या नावाखाली एजंटराज; तात्काळ रद्द करण्याची संतप्त मागणी

इचलकरंजी :

यंत्रमागधारकांना विज दर सवलत मिळण्यासाठी करण्यात आलेली सक्तीची ऑनलाईन नोंदणी ही लुटीचे साधन ठरत असल्याचा आरोप करत, ती तात्काळ रद्द करावी अशी जोरदार मागणी यंत्रमागधारक जागृती संघटनेने केली आहे. यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांच्याकडे निवेदन दिले.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमुळे एजंटांचा सुळसुळाट झाला असून ते प्रति कनेक्शन १० ते १५ हजार रुपयांची उघड मागणी करत आहेत. आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या लहान-मोठ्या यंत्रमागधारकांसाठी हा खर्च परवडणारा नसल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे.

एजंटांकडून ऑनलाईन नोंदणी करून UID क्रमांक देण्यात येतो आणि त्यानंतर फाईल नागपूरमार्गे मुंबई मंत्रालयात पोहोचवली जाईल, असे सांगितले जाते. मात्र, अंतिम मंजुरीसाठी पुन्हा यंत्रमागधारकांनाच मंत्रालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याने ही प्रक्रिया अधिक क्लिष्ट व त्रासदायक ठरत आहे.

या पार्श्वभूमीवर, “सक्तीची ऑनलाईन नोंदणी म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी घालणे आहे का?” असा थेट सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.

मुख्य मागण्या :

विज सवलतीसाठीची सक्तीची ऑनलाईन नोंदणी तात्काळ रद्द करावी

एजंटमार्फत होणारी लूट त्वरित थांबवावी

पारदर्शक व सुलभ नोंदणी प्रक्रिया लागू करावी

संघटनेने पर्याय म्हणून सुचवले आहे की, शासनाने साधा, सोपा ऑनलाइन फॉर्म (उदा. गुगल फॉर्म) उपलब्ध करून द्यावा. यंत्रमागधारकांनी स्वतः मोबाईलवरून माहिती भरल्यानंतर त्यांना कोणत्याही शासकीय कार्यालयात न जाता थेट विज बिलात सवलत मिळावी.

ही मागणी तातडीने मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा