डीकेटीई सिव्हील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी
इचलकरंजी :
डीकेटीई टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या सिव्हील विभागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धा, हॅकॅथॉन व तांत्रिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रॉनिक्स व सॉफ्टवेअरचा वापर करून बांधकाम, नागरी सुविधा, स्मार्ट पार्किंग, कृषी व अंतराळ क्षेत्राशी संबंधित अभिनव प्रकल्प सादर करण्यात आले.
गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांनी १२ हून अधिक पारितोषिके मिळवली असून त्यात ६ प्रथम क्रमांकांचा समावेश आहे. वासवी कॉलेज (तेलंगणा), वॉलचंद कॉलेज (सांगली), संत गजानन महाराज कॉलेज (महागाव) आदी ठिकाणी प्रकल्प सादर करून गुणवत्ता सिद्ध केली.
आयडिया लॅब, आयआयसी व स्टार्टअप उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन व नवोन्मेष वृत्ती विकसित होत असल्याचे संचालिका डॉ. एल. एस. आडमुठे यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले
डीकेटीईच्या सिव्हील विभागातील विद्यार्थी तेलंगणा येथील वासवी कॉलेज मध्ये संशोधन प्रकल्पाचे बक्षिस स्विकारताना.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800


