ICHMH51NEWS.IN
9921600800

आक्काताई पाटील कन्या महाविद्यालयाचा बारावी निकाल उत्कृष्ट

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आक्काताई पाटील कन्या महाविद्यालयाचा बारावी निकाल उत्कृष्ट

इचलकरंजी :
पंचक्रोशीतील मुलींसाठी नामांकित असलेल्या श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाचा बारावीचा निकाल यंदाही उत्कृष्ट लागला आहे. कला शाखेचा निकाल ९१.३० टक्के, कॉमर्स शाखेचा ८७.६५ टक्के तर एकूण सरासरी ८९.५९ टक्के नोंदविण्यात आली.
कला शाखेत कुमारी सायली सुरेश देसाई हिने राज्यशास्त्र विषयात १०० पैकी ९८ गुण मिळवत बोर्डात प्रथम येण्याचा मान पटकावला असून महाविद्यालयातही प्रथम क्रमांक मिळवला. तर कॉमर्स शाखेत कुमारी संस्कृती सचिन डोणे हिने ८८.१७ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला.
या यशाबद्दल प्रभारी प्राचार्या प्रो. डॉ. त्रिशला कदम यांनी विद्यार्थिनी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले. विद्यार्थिनींनी पुढील शिक्षणही याच महाविद्यालयात पूर्ण करून उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा