इचलकरंजीत बंद घर फोडून तब्बल दहा लाखांचा ऐवज लंपास
इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील टाकवडे रोड परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १० लाख १४ हजार २०० रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी इचलकरंजी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उल्हास विठ्ठल भोसले (वय ५०, रा. टाकवडे रोड, इचलकरंजी) हे कुटुंबासह यड्राव येथे नातेवाईकांच्या डोहाळे जेवण कार्यक्रमासाठी गेले होते. दरम्यान, ७ मे रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी तिजोरी उचकटून त्यामधील सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण १० लाख १४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
याबाबत इचलकरंजी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







